मी पणा !
काई लोकं राज्या लयच करते 'मी' 'मी',
स्वत:च सार्याले सांगे माह्यासारखा हुशार नाई !
स्वच:ला समजते थो ग्रेट जगात सार्यापेक्षा,
सगळैनं माह्यी स्तुती करावी हीच त्याची अपेक्षा !
मलेच येतं सारं कुणाले काई समजत नाई,
आपलं मत मांडाचं असते त्याले घाई !
मागुन देते लोकं शिव्या त्याले माईत नाई,
त्याच्या सारखा हुशार ह्या जगात कुणी नाई !
मी असं केलं मी तसं केलं मीच लय भारी,
तुम्ही सारे बैल हाय मीच हाय एक नंबरी !
मी आहे तर तुमी आहे म्याच केलं सारं,
जास्तीच भाव खायचं हे वारं त्याले लागलं !
अरे भल्या माणसा आता सोड हे 'मी' 'मी',
यापेक्षा करण्यासारखं बरच हाय काई !
तुह्यातल्या 'मी' ले तुह्या कर्माने मोठं कर,
कर्तृत्वाने सिध्द हो मंग जग घेईन डोक्यावर !
- किशोर तळोकार ९६७३०६०७६२

No comments:
Post a Comment