Saturday, 18 March 2017

पोशिंदा जगला पाहिजे...!


पोशिंदा जगला पाहिजे...!

पहाट झाली की त्याला हुरहुर लागते
त्या हिरव्यागार शेतात झुलणार्या 
पिकाची....
खुप जपतोय त्याला तो आपल्या
पोटच्या लेकरासारखं..
वादळ, वारा, पाऊस सगळ्यांपासुन
सांभाळतोय त्याला
पोटाला पिळ देवुन मिळालेल्या आयुधानं..
सगळी धग उराशी पेलुन गोंजारत असतो
तो जनतेची भुक त्याच्या शेतात...
खरेतर त्याचीही असते ती भाकर पण,
काय आहे नं.. निसर्गाचं ऋण फेडावं लागतं
हे जाणतोय तो...
म्हणुन राबतो तो पर्वा न करता..
घामासकटं रक्त सांडवत असतो भर ऊनात...
वेळ प्रसंगी दाणाही नसतो पोटात त्याच्या..
पिल्लांसाठी वाचवायचा असतो ना..
त्याचा भाबळा आशावाद भागवतो
त्याची कोरडी भुक..
जीवन जगत सारे संकटं एकटाच
पेलतो छाताळावर..
म्हणुन तर तो पोशिंदा आहे...!
पण ह्या पोशिंद्यावर अस्मानी संकट आलं तर..?
कुणी त्याच्या रक्ताच्या थेंबाची
थुंकी ऐवढीही किमंत नाही केली तर....?
त्याच्याच नावावर राजकारण 
करून कुणी पोळ्या शेकल्या तर... ?
कर्जाच्या गर्द खाईत त्याचं
भविष्य लटकतयं...!!!!
ज्याची कर्जानं ईजार फाटली तरी
सगळी झोळ आपल्या पुढं रितं करणार्या
ह्या पोशींद्यास कुणी जगवेल का....?

किशोर तळोकार ९६७३०६०७६२

No comments: