🕊 मुक्त श्वास..! 🕊
- किशोर तळोकार ९६७३०६०७६२
हवा आहे येथे मुक्त श्वास ईथल्या अविचारी कोंदट व्यवस्थेतुन...
निगरगट्ट झाली ही व्यवस्था अन् तिला चालवणारी तिची निर्लज्ज पिलावळं..
न जाणे कुठल्या आंतरिक सुखाचा हव्यास
त्यांना असंवेदनशील कृत्य करण्यास धजावतो...
कुठे नरसंहार आहे तर कुठे इभ्रतीचा निर्वस्र चित्कार...
तहानेने विव्हळणार्या जनावरांना जलकुंभातला थेंबही प्राशू नये ईतकी पशूवस्था...
हरवत चालला आहे माझ्या तुझ्यातला आत्मसंवाद,
अन् पेरतो आहे वासनेच्या दुर्गंधातुन नराधमी बीजं..
हिरवळीवर घोंवणारी, लाळगाळणारी संस्कृती येत आहे..._
मग पात्रता नसतांनाही तेच ठरतात तुमचे आमचे रक्षक आणि पथदर्शक...
अजून किती फास घ्यावे ह्या गळ्याने..?
कुणीतरी खोदून काढावी ही खोल रूतलेली अन्यायाची पाळेमुळं....
अन् घेवु द्यावा मुक्त श्वास अनंतआत्म्यातुन.!
🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁

No comments:
Post a Comment