हे युगा या जनास तु समानतेचा गंध दे,
मनुवादी मनास या माणुसकीचा रंग दे!
प्रगतीच्या पंखाची झेप खोटीच वाटते,
खुळचट विचारांना पुरोगामी संग दे!
व्यभिचार पांघरून महाराज माजले,
पुन्हा माणुसकी धर्म सांगणारा संत दे!
वेगवेगळ्या रंगानी सारे भ्रमीत झाले,
एकतेचा रंग चढलेला आसमंत दे!
वरवरच्या प्रेमाने नाते कोरडे झाले,
आतुन वाहणारा प्रेमझरा अभंग दे!
- किशोर तळोकार ९६७३०६०७६२
दि. १३/०९/१७ वेळ रात्री११.३०
मनुवादी मनास या माणुसकीचा रंग दे!
प्रगतीच्या पंखाची झेप खोटीच वाटते,
खुळचट विचारांना पुरोगामी संग दे!
व्यभिचार पांघरून महाराज माजले,
पुन्हा माणुसकी धर्म सांगणारा संत दे!
वेगवेगळ्या रंगानी सारे भ्रमीत झाले,
एकतेचा रंग चढलेला आसमंत दे!
वरवरच्या प्रेमाने नाते कोरडे झाले,
आतुन वाहणारा प्रेमझरा अभंग दे!
- किशोर तळोकार ९६७३०६०७६२
दि. १३/०९/१७ वेळ रात्री११.३०
No comments:
Post a Comment