पाखरे
पंखात आसमंत घेऊन,
आकाशी बेधुंद उडतात पाखरे ।
वेगात वळतात वळणे घेऊन,
किती स्वच्छंदी दिसतात पाखरे ।
उडता उडता जाती थकून,
अचूक निवारा शोधतात पाखरे ।
किलबिलाट पिलांचा बघून,
मुखी त्यांच्या घास भरवतात पाखरे ।
वेध संकटाचा हळुच घेऊन,
लगेच निवारा बदलवितात पाखरे ।
अस्मानी संकटे गेले येऊन,
तरी हिमतीने जवाब देतात पाखरे ।
घरट्यातील पिलांना घेऊन,
थव्यात ऐक्य सदा जपतात पाखरे ।
नात्याची ही जाण राखून,
आजन्म संबंध समजतात पाखरे ।
निसर्गाचा हा कौल समजून,
माणसहो..! माणसात ऐक्य जपारे ।
- किशोर तळोकार
(9673060762)
दि.17/03/15
पंखात आसमंत घेऊन,
आकाशी बेधुंद उडतात पाखरे ।
वेगात वळतात वळणे घेऊन,
किती स्वच्छंदी दिसतात पाखरे ।
उडता उडता जाती थकून,
अचूक निवारा शोधतात पाखरे ।
किलबिलाट पिलांचा बघून,
मुखी त्यांच्या घास भरवतात पाखरे ।
वेध संकटाचा हळुच घेऊन,
लगेच निवारा बदलवितात पाखरे ।
अस्मानी संकटे गेले येऊन,
तरी हिमतीने जवाब देतात पाखरे ।
घरट्यातील पिलांना घेऊन,
थव्यात ऐक्य सदा जपतात पाखरे ।
नात्याची ही जाण राखून,
आजन्म संबंध समजतात पाखरे ।
निसर्गाचा हा कौल समजून,
माणसहो..! माणसात ऐक्य जपारे ।
- किशोर तळोकार
(9673060762)
दि.17/03/15

No comments:
Post a Comment