Monday, 23 March 2015

ती रात

           ती रात......
एकदा अचानक अशी जाग आली,
अस्पष्ट एक चेहरा रात उसवून गेला ।

मंद वार्‍याचा हळूवार तो स्पर्श,
तुझ्या असण्याचा भास देऊन गेला ।

चंद्राच्या त्या मंद प्रकाशात,
तुझा नेहमीचा तो सुगंध येऊन गेला ।

हळूवार ऐकू येणार्‍या गीतांच्या ओळी,
चंद्रच तुझा हात हातात देऊन गेला ।

स्पर्श तुझ्या हाताचा तो खट्याळ बहाणा,
तुझ्या ओठांची कळी खुलवून गेला ।

तुझी नी माझी नजर एक होताच,
हर्षाने मनाचा कोपरा बहरून गेला ।

ती रात तुझ्या सवे अशी फुलली,
न कळले कधी दिस उजाळून गेला ।

तुझ्या माझ्या ह्या गोड आठवणीचा,
तो अंधूक स्वप्नथवा स्मरणात राहून गेला ।

- किशोर तळोकार
9673060762
दि.23/03/15

No comments: