Wednesday, 25 March 2015

लेख - वाॅट्सअप च्या निमित्ताने...

"वाॅट्सअपच्या निमित्ताने.."
(हे काय चाललयं.?)
                          ( नक्की वाचा)
.....रोज रोज वाट्सअपवर हूंदळायचं काय जणू वेडचं लागलयं..! हे वाचू की, ते वाचू ह्या गृप वर जावू की त्या गृपवर जावू त्याला कमेंट करू की ह्याला कमेंट करू सगळा गोंधळ उडवणारा क्षणिक सुख देणारा हा खेळ. अगदी व्यसनापेक्षाही चिवट.  कुठल्याही तंञज्ञानाचा योग्य वापर केला की ज्ञान हे मिळतेच पण जर अतिरेक केला तर त्याचा माणसिक ञास होणारच..! वाॅट्सअप वरील काही पोस्ट खरोखरच खुप वाचनिय व प्रबोधन पुर्ण असतात. तर काही निव्वड फालतू बकवास..! ज्याचा काही तालाला मेळ नसतो. त्यात काही सन्मानीय, कुठल्याही पोस्टचा विचार न करता सेंड करण्याचा सारखा सपाटा  लावतात.  काय पराक्रम वाटतो देव जाणे..! काहीजण मोचकेच पण मार्मिक आशयाचे पोस्ट टाकतात त्यांचे अभिनंदनच..! पण त्याच त्या रटाळ पोस्ट पायी चांगल्या गोष्टीवर बर्‍याचदा दुर्लक्ष होऊन जातं. आणि  ह्या फालतूपणा मुळे डोक्याचा पार खिमा होऊन जातो. मग असं वाटतं नको ते टुकटुक करणारं ञासदायक  वेड लावणारं "वाटस्अप".! पण भागवत सरांच्या कविते प्रमाणे त्याचा "मोह आवरेणा...."
....फक्त मिञहो एवढचं सांगावसं
वाटतं की, कुठल्याही वस्तुचा अती वापर हा वाईटच असतो. तेंव्हा सर्वांनी "प्रमाण" ह्या रामदासांच्या ओवी वाचायला पाहीजे असे वाटते. प्रत्येक तंञज्ञान हे आपल्यासाठी अधिक उपयुक्त अन् सोईचे जरी असले तरी ते क्षणिक असते हे विसरू नये. रोज वाॅट्सअपवर भेटणार्या मिञांचे हाय हेलो नित्य असते. माञ ते जेंव्हा प्रत्येक्षात भेटतात तेंव्हा ओळखही नसल्या सारखं दाखवणे ही बाब गंभीर वाटते. कुठतरी माणूसपण व नाते संबध तात्पूरते वाटायला लागते. ह्याला काही अर्थ नाही. मिञहो मनातून एकदा तरी सहज कुणाला
"तुझी आठवण आली" असे म्हणुन फोन करा..!  त्याला दोन शब्द त्याच्या व घरच्यांच्या प्रकृती विषयी विचारा..! पहा त्यालाही खुप बरं वाटेल व आपल्याही खुप छान वाटेल. बघा प्रयत्न करून. हा माझा स्वानुभव आहे. म्हणून शेअर  करतोय. सगळं काही करा आयुष्यात अजून भक्कम उंची गाठा. पण माणूसकी सोडू नका मिञहो ह्यातच खरं समाधान आहे..
---किशोर तळोकार 9673060762
दि. 24/03/15

1 comment:

Prafulla Mahure said...

WhatsApp चा वापर कमी आणि गैरवापर जास्त होतांना दिसतो.तसेच शिक्षकांना WhatsApp बंधनकारक करणे जरा अतीच वाटते.