ही रात अशी दिवानी अचानक बहरून गेली,
चांदण्यांशीच खेळावे ती अशी खुणावून गेली ।
मीच माझा असा कसा अवेळी हरवून जातो,
ती आली अशी अन् हळूच ह्रदय चोरून गेली ।
ह्याला त्याला कुणालाही माझेच मी म्हणतो,
तीच माणसे अशी ऐनवेळी दगा देवुन गेली ।
तो कशाला हा कशाला माणूसच निवडतांना,
आरसेहीे माझी मला ओळख सांगून गेली ।
सर्वच शुन्य वाटते तिच्या पुढे आयुष्य आता,
ती जन्म देवुन मला जग दाखवून गेली ।
(एक प्रयत्न केला मिञहो..! सुचना वजा मार्गदर्शन कराल..)
-- किशोर तळोकार
9673060762
दि. 27/03/15 वेळ 11.11 pm

No comments:
Post a Comment