Thursday, 12 March 2015

रेस । केस ।। देस ।।

रेस । केस ।। देस ।।

जो तो करतो आता एकमेकाशी रेस,
कधी परिक्षेची रेस,
तर कधी पैशाची रेस ।

स्वसुखासाठी सदा भांडतो पुरा देस,
कधी खुर्चीसाठी रेस,
तर कधी जमिनीसाठी रेस ।

सार्या न्यायालयात पडल्या खंडीभर केस,
कधी लेकाची न बापाची केस,
तर कधी नवर्याची न बायकोची केस ।

नेहमी सांगे काया दगडावरची रेस,
कधी बेईमानाची रेस,
तर कधी अन्यायाची रेस ।

एवढे महापुरुष झाले तरी बदलला नाही देस,
कधी हा भ्रष्टांचा देस,
तर कधी नराधमांचा देस ।

-- किशोर तळोकार
दि.12/03/15 वेळ. 6.40 pm
9673060762

No comments: