धुईमाती
.... माया सार्या दोस्तैसाठी हा उतारा...
शिमगा आला म्हंजी मले लय खुशी येते,
पोट्टे मंधी जावून मले रंगानं लय भिजावं वाटते,
सांगतो एक गंमत एैका राजेहो तुमी,
आजच्या दिशीकिनाई लय मजा आली,
आमी सबंदजण निगालो घेवून पिचकारी,
गन्यानं आनला रंग गेलो पक्याच्या घरी,
दरवाज्याले कुलूप होतं आंद्र चालु व्हती टीवी,
म्या म्हनलं गन्या, हे कसं चीभीन.!
गन्यानं दिला आवाज मारली एक शिटी,
आतुन आला आवाज माईत नई "हे" गेले आहे कुटी,
म्यां म्हनलं घरातच हाय संडासात वाजली खुळखुळ,
पक्या दळला होता भितीपाई आंतमंदी दळून,
घेतली एक पिचकारी टाकली शेद्रामंदी,
चरचरं सोडला रंग तो गेला त्याच्या तोंडामंदी,
आयो आयो आवाज आला...
लाल कारंबेरं तोंड झालं म्हणे थांबा आता तुमी,
दोघाईले घेतो लेकेहो चांगला आता शेणांमंदी ,
अशी झाली धुईमाती बेज्जा रंगलो आमी,
तुमीबी खेळुन पहा ही प्रेमाची धुईमाती,..।।
🍁किशोर तळोकार 🍂🌿
दि.06/03/15
बुरा मत मानो होली है।।।।😜😜😜😜😜😃😝😃😝

No comments:
Post a Comment