Saturday, 24 September 2016

समाजाला उद्बोधनाची गरज......!

                 
                                          - किशोर तळोकार 

     राज्यात नव्हे तर देशातच आपलं अस्तीत्व  अबाधित राहण्यासाठी नवनवे शक्तीस्ताने शोधण्याचा, राबवण्याचा चंगच जणू प्रत्येक समुदयाने बांधला आहे. हि असुरक्षितता  निर्माण होण्यामागे नेमके कोणते कारण असावे ..?  हा संशोधनाचा मुद्दा आहे. राज्यातील  जातिय समुदाय आपले जातीय अस्तित्व कसे टिकून राहिल ह्याचे प्रयत्न करू पहात आहे. मोर्चे बांधणी, आंदोलने हे त्याचेच द्योतक आहे. परंतु उच्चवर्नियांकडून दीन  दलांवर होणारे अन्याय, मुस्कटदाबी अशा घटना इतिहास जमा आहेतच. आजही अशी परिस्थिती निर्माण व्हावी असावी  हे समाजाच्या  आधुनिक युगाचे, पुरोगामित्वांचे कुठले लक्षण मानावे हे कळत नाहि..!
     जातीभेद हि समाजाला लागलेली कीड आहे ती जाता जात नाही.  वाटल होतं,  आम्ही विज्ञान  युगात जगतोय त्यामुळे हि जातीयवादी तुच्छ बंधने आम्हाला  रोखणार नाही . परंतु ह्या प्रगत राष्ट्रात  आम्ही विकास जातीशीच खात असू तर ह्या पेक्षा दुर्दैव ते कोणते ....! माध्यमे समाज व प्रशासन ह्यातील दुवा आहे. समाजाच्या हितकारक व न्याय मत मांडण्याचे  निर्भीड काम करीत असताना कधी कधी मध्येच जातीच्या वल्ग्नेची पुसटशी रेष समाजमनावर कोरतांना दिसतात हे  नों दविल्या शीवाय दखल पूर्ण होणार नाही. जातीय वाद हा कमी झाला आणि आमचा विकास होतो आहे. हे फक्त असत्य स्वप्नच ठरू पहात आहे..!  आमची आज वैचारिक पातळी खालावलेली  असून मानसिकता आदिम काळातील अज्ञानी व नृशंस मानवासम झालेली दिसून येत आहे. तर कधी प्रचंड बालिश आवेशही बघायला मिळत आहे. अश्या चीन्तस्थ व दुर्दैवी बाबी नजरेत येऊ लागल्या आहे. म्हणून आम्ही पुढारलोत, तांत्रिक व विज्ञान युगात जगतोय. असे म्हटल्यास विचारवंताना  व संशोधकांना शून्यात जाण्याची वेळ येईल. आज  नको तिथे अगदी लहान सहान गोष्टीतही हि राजकारणी मिसुरढ फुटलेली तरुणपिढी आपापल्या जातीतला खंदा कार्यकर्ता व पुढारी असे  बिरूद लावून जातीय अभिमानाचा शंख फुंकत नीतिमत्तेच्या पोकळ गप्पा करतांना दिसत आहे. सामाजिक संस्काराचा भर बाजारी लिलाव होताना दिसत आहे. आजचा युवक अशा भेदावादाचे वातावरण निर्माण करीत असेल तर  हि अत्यंत खेदजनक बाब आहे. समाज प्रतिनिधी पुढारींचे फुटीरतावादी विधाने व कार्यावाह्या सर्वकाही सर्वसामान्य मतदारांना बुचकळ्यात पाडण्यासारख्या गोष्टी आहे. 
     प्रत्येक समाज आज रस्त्यावर उतरला आहे.  आरक्षणाच्या मुद्यावर शासनाशी भांडत आहे. आरक्षण ह्या मुद्यावर प्रत्येक जात पेटून उठते असेका ? आरक्षण फक्त प्रोत्साहन असून ती कुणाची मक्तेदारी नाही. आरक्षणात आरक्षण अशी वेळ आज समाज स्थितीची झालेली आहे. ज्या समाजात वा जातीत आरक्षणाची गरज आहे. तिथेच  कुटुंबपरत्वे लागू करायला हवे. जो समाज विकासाच्या आजही कोसो दूर आहे. जे शिक्षणाच्या प्रवाहात अजूनही नाही.  त्याच  समाजाला प्रोत्साहन देऊन प्रवाहात आणले पाहिजे. आरक्षण हे आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांनाच व कुटुंबांनाच द्यावे मग ते कुठल्याही जातीचे वा धर्माचा असू देत...!  हीच भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीही असावी असे वाटते. कायदा व घटनेत परिस्थितीनुसार बदल घडत राहणे म्हणचजे  जिवंत माणसाचे लक्षण आहे. असे विचारवंतांनी म्हटले ते खोटे नाही. आरक्षित समाजामध्ये १००% समाज हा आर्थिक व शैक्षणिक दुर्बल असेलच असे नाही. त्यामुळे आरक्षण ह्याहि  बाबीवर विचार होणे आवश्यक आहे.
    
     अन्याय अत्याचाराविषयी समाज आंदोलने मोर्चे उभारत असतांना  प्रत्येक जातीच्या म्होरक्यांच्या मनात नेमके काय सुरु आहे. हे सामील होणार्या लोढयांना समजणे सहज शक्य नसते . आपला इगो व श्रेय चघळण्याच्या मानसिकतेने समाज होरपळतोय.  आणि राज्यकर्त्यांना त्यांना  त्याच्यातच  गुरफटू द्यायचे आहे असे प्रतीत होते. सार्वजनिक, सर्वसमावेशक, जनहित, देशहित, समाजहित पूर्णत; गळून पडले आहे. धर्म व जातीचा विकास जातीनिहाय, धर्मनिहाय, वर्गनिहाय पुढार्यांच्या उथळ व स्वार्थी धोरणाने समाज व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. अश्या अवस्थेत राष्ट्राच्या प्रगतीची अपेक्षा केवळ हास्यास्पद बाब ठरेल..!

     आपला देश सर्वधर्म समाभावाचा पुरस्कार करत मोठ्या अभिमानाने जगात मिरवतो पण सर्वधर्म समभाव आपल्या व्यवस्थेत मुळात रुजलेला आहे का ?? हा प्रश्न आहे. जात-जात धर्म-धर्म आपण अस्तित्व अबाधीत ठेवण्याच्या नादात देश आतल्याआत भेदवादाने पोखरल्या जात आहे. समाज ऐक्य विखुरल्या जात आहे. अशी शोकांतिका समाजाची आहे.
    
     एखाद्या जातीतल्या व्यक्तीद्वारे परजातीतील व्यक्तीवर अन्याय, अत्याचार झाला असेल. तर त्या संपूर्ण जातीय समुदायालाच वेढीस धरल्या जाते. गुन्हेगार समजल्या जाते. परंतु अन्याय, अत्याचार व  बलात्कार करणारी मानसिक विकृती हि जात पाहून जन्माला येत नाही. तर त्याला त्याचा अवतीभवतीचे वातावरण जबाबदार असते. गुन्हेगार हा त्याला त्याच्या तत्कालीन परिस्थितीतून योग्य मार्गाने त्याचे वैचारिक पोषण व उद्बोधन न झाल्यास घडतो. योग्य दर्शन व प्रेम विश्वास अभावी असुरक्षितता त्याच्या मनात जागा करते व दुष्कृत्य करण्याची त्याची मानसिक स्तिथी तयार व्हायला लागते. कुठलाही व्यक्ती मुळात अट्टल गुन्हेगार नसतोच. त्याला सामाजिक वातावरणच जबाबदार असते.  त्यासाठी प्रत्येक समाजाने मोर्चे आंदोलन करून गर्दी वाढवण्यापेक्षा शक्ती प्रदर्शने करण्या पेक्षा प्रत्येक समुदयाने उद्भोबोधन वर्गाचे आयोजन करावे. संस्कार शिबिराचे मंदिरात, प्रार्थना स्थळी आयोजन करावे. उद्बोधनाने  मानुस घडेलच असे नाही. परंतु त्यातून काही तरी सकारात्मक फरक दिसून येईल हे नक्की..! सोबतच शाळा महाविद्यालातून आचरण शिबिरे व आचरण नियम बंधने लागू करणे गरजेचे आहे. कारण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायदा करून किंवा शिक्षा देऊन जर काही बदल घडला असता. तर आज हि परिस्थिती उद्भवली नसती. म्हणून समाज उद्बोधन सातत्याने होणे गरजेचे आहे.

-किशोर तळोकार
9673060762
जिल्हाध्यक्ष यवतमाळ 
शिक्षक साहित्य संघ महा राज्य 
kishortalokar.blogspot.com
risingkt@gmail.com


No comments: